सोशल मीडिया चालवणाऱ्यांनो सावधान बीड पोलिसांची करडी नजर | Beed Marathi News

 Beed Marathi News

 आचारसंहितेच्या काळात  सोशल मीडियावर  वादग्रस्त पोस्ट   टाकल्यास पोलिसांच्या  कारवाईस सामोरे जाऊन गुन्हा दाखल होणार .

Beed Marathi News
Beed Marathi News

बीड . सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्रातील  लोकसभा निवडणूक  २०२४ च्या पार्श्वभूमीवर  संपूर्ण राज्यात आचार संहिता असताना   काही समाजकंटकाकडून  राजकीय नेत्यावर , महापुरुषावर , किंवा  समाजा समाजामध्ये   अतिशय खालच्या दर्जात , फेसबुक , व्हाट्सअप , इंस्टाग्राम , ट्विटर, युट्युब , अशा अनेक सोशल मीडियाच्या माध्यमांन मार्फत वादग्रस्त पोस्ट  व्हायरल करत  आहेत .  अशा पोस्ट  टाकणाऱ्या व्यक्तीवर  कारवाई होणार आहे . या कारवाईसाठी  बीड जिल्हा पोलीस प्रशासन , तसेच सायबर  विभाग , पूर्णपणे हाय अलर्ट मोडवर  आले असून सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या वादग्रस्त पोस्टवर   कारवाईस देखील सुरुवात केलेली आहे . त्यामुळे सोशल मीडिया धारकांनो वादग्रस्त पोस्ट  टाकत असाल तर सावधान .सोशल मीडियावरील वातावरण ढवळणाऱ्यांना , समाजामध्ये  अशांतता  ठेवण्याचे हेतूने  वादग्रस्त पोस्ट  टाकून  वातावरण बिघडवणाऱ्यां व्यक्तीवर  कडक कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासन ॲक्शन  मोडवर आले असून गुन्हे दाखल करण्यास सुरुवात ही झालेली आहे . त्यामुळे कोणत्याही नेत्याच्या विरोधात  वादग्रस्त मजकूर  सोशल मीडियावर प्रसार  करत असाल तर  करू नका . सोशल मीडियावर  चुकीचे प्रकार निदर्शनास आले  तर त्यावर प्रशासना मार्फत  गुन्हा दाखल होणार आहे . सोशल मीडियावर चालू असलेल्या बारीक बारीक गोष्टीवर सध्या प्रशासनाचे बारीक लक्ष आहे . कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही प्रकारचा कायदा हातात घेऊ नये याची पण सर्वांनी काळजी घेणं गरजेचे आहे . सोशल मीडियावर चुकीचा प्रकार निदर्शनास येत असल्यास , किंवा कोणी वादग्रस्त पोस्ट  व्हायरल, प्रोफाइल स्टेटस ठेवून ,  शेअर करत असल्यास त्यावर चुकीची  कमेंट करणाऱ्या  व्यक्तीवर पण  गुन्हा दाखल होणार आहे . अशा वेळेस  सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्ट निदर्शनास आल्यास  अत्यंत गांभीर्याने  ही गोष्ट लक्षात घेऊन सोशल मीडियावरील पोस्ट, मजकूर  प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावा . मात्र आपण स्वतःहून  कोणीही कायदा हातात घेऊ नये .

                  बीड पोलीस प्रशासनाकडून  सोशल मीडिया धाराकांना आव्हान करण्यात आले आहे  कि कोणीही कायदा हातात घेऊ नका . लोकसभेच्या निवडणुका शांत वातावरणात पार पडलेल्या असून काही सोशल मीडिया धारकांकडून गावागावांमध्ये  तणावपूर्ण वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे . सर्व समाजाने  सामाजिक बांधिलकी राखावी . निवडणुका झालेले आहेत  त्यामुळे  निवडणुकांचे डोक्यातील भूत काढून टाकून  सर्व जाती धर्मातील लोकांनी एकजुटीने राहावे . तरुणांनी  सोशल मीडिया मार्फत  माथी भडकवण्याचे काम बंद करून आपल्या दैनंदिन कामात व्यस्त व्हा आणि दोन पैसे कमवण्यासाठी कामाला लागा. तसेच तरुण पिढीने जातीयवादाचा  व्हायरस आपल्या डोक्यातून काढून टाका . सोशल मीडियावर पोस्ट टाकने टाळा . आणि एवढे सांगू नाही  सोशल मीडिया वादग्रस्त पोस्ट आढळून आल्यास  त्याची खैर केली जाणार नाही  असे बीड पोलीस प्रशासना कडून स्पष्ट करण्यात आले आहे . 

सोशल मीडियावर एखादी वादग्रस्त पोस्ट  निदर्शनास  आल्यावर  या गोष्टी कराव्यात.

१) पोस्ट पुढे फॉरवर्ड करू नका.

२ ) पोस्ट खाली मजकूर लिहू नका .

३) तत्काळ पोलीस प्रशासनास माहिती कळवा .

४ ) वादग्रस्त पोस्ट ची स्क्रीनशॉट काढून  पोलीस प्रशासनाकडे       झेरॉक्स प्रत जमा करून  तक्रार नोंदवा . 

 पोलीस प्रशासन अंमळनेर 

बीड जिल्ह्यातील अंमळनेर येथे वेगवेगळ्या संघटनांमार्फत सोशल मीडियावर चालू असलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर, पोस्टवर  कारवाई करण्यासाठी पोलीस स्टेशनला   निवेदन देण्यात आली. अंमळनेर पोलीस प्रशासना कडून अंमळनेर , पिंपळवंडी  व परिसरातील गावोगावी जाऊन  बैठक घेऊन  सोशल मीडिया मार्फत होणारे समाजा समाजामध्ये  वाद टाळण्यासाठी  सोशल मीडिया धारकांना  बैठकीत कारवाई   होणार असल्याचे सांगण्यात आले . 



Post a Comment

0 Comments