आज मनोज जरांगे पाटील यांची १०० एकर वर सभा | Manoj Jarange Patil Marathi News

 Manoj Jarange Patil Marathi News 

आज आष्टी तालुक्यातील वाघळुज येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठक आयोजित करण्यात आली आहे .

Manoj Jarange Patil Marathi News

Manoj Jarange Patil Marathi News 

आष्टी प्रतिनिधी .मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण राज्यामध्ये लढा लढविणारे संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आष्टी तालुक्यातील वाघळूज येथे मराठा समाजाची संवाद बैठक आज दि.९रोजी  गुरुवारी सायंकाळी सहा वाजता होणार आहे. या संवाद बैठकीला  मोठ्या सभेचे स्वरूप आले असून जवळपास शंभर एकरमध्ये या सभेची तयारी पूर्ण झाली आहे.

                  आठ जून रोजी नारायणगड येथे मराठा समाजाची मोठी सभा होणार आहे. याच सभेच्या पूर्वतयारीसाठी आष्टी तालुक्यातील वाघळूज येथे गुरुवारी सायंकाळी सहा वाजता संवाद बैठक होणार आहे. नगर बीड राष्ट्रीय महामार्गावर वाघळूज येथील आंबेश्वर कृषी पर्यटन केंद्रा शेजारच्या लगत 100 एकर जमिनीमध्ये या संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या आठ दिवसापासून या संवाद बैठकीची जोरदार तयारी सुरू झाली असून लाखो मराठा समाजबांधव या ठिकाणी एकत्रित येणार आहेत. लोकसभा निवडणुक मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना आष्टी तालुक्यामध्ये जरांगे पाटील यांची संवाद बैठक होत असल्याने या बैठकीमध्ये  पाटील कोणती भूमिका स्पष्ट करतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.



Post a Comment

0 Comments