Manoj Jarange Patil Marathi News
Manoj Jarange Patil Marathi News |
फेमस चेहरा
👉 नाव - मनोज जरांगे पाटील ( मराठा आरक्षण )
👉 पूर्ण नाव - मनोज रावसाहेब जरांगे ( पाटील )
👉आई - प्रभावती . पत्नी - सौमित्रा.
👉 जन्म - १ ऑगस्ट १९८२
👉 मूळ गाव -मातोरी (जि. बीड )
👉 सध्या - अंबड ( जि. जालना )
👉शिक्षण - १२ वी
👉 सन २०११ मध्ये शोभा संघटनेची स्थापना.
👉 सन २०१२ शहागड उड्डाण पूलवर ७ दिवस आमरण उपोषण.
👉 सन २०१३ शहागड ते मुंबई पायी दिंडी.
👉सन २०२१ साष्ट पिंपळगाव येथे ९० दिवस ठिय्या आंदोलन .
👉जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथे २९ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर १७ दिवस आमरण उपोषण.
👉अंतरवाली सराटी लाठीचार्ज घटना १ सप्टेंबर २०२३.
👉 अंतरवाली सराटी ते मुंबई आंदोलन १८ जानेवारी ते २८ जानेवारी.
जगातील सर्वात मोठी सभा घेणारे व्यक्ती कोण आहे . ज्याचे गिनीज बुकला नोंद घ्यावी लागली.
Manoj Jarange Patil Marathi News |
स्वाभिमान, कर्तुत्व , समाज यापुढे सगळ्या गोष्टी शून्य आहेत हे तत्व सांभाळणारे व्यक्तिमत्व म्हणजे - मनोज ( दादा ) जरांगे पाटील .
सरकारने भरपूर आमिषे दाखवले , पद , पैसा , सत्ता पण कसल्याही पदाला बळी न पडणारा व्यक्ती मॅनेज ना होणार व्यक्ती . राज्य सरकारने त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिल. देशाने तसेच महाराष्ट्राने महाराष्ट्रातील जनतेने मनोज जरांगे पाटला सारखे मॅनेज न होणारे , स्वाभिमानी व्यक्तिमत्व पहिल्यांदाच पाहिले . आज या इमानदार मनोज जरांगे पाटलांमध्ये अखंड महाराष्ट्रातील तसेच देशातील संपूर्ण मराठा समाज पाठीमागे आहे . मनोज जरांगे पाटील यांच्या फक्त एका आदेशाची वाट मराठा समाज पाहत आहे .
पाचवी पास शिक्षण असलेला व्यक्ती , घरी खायला अन्न नाही बिकट परिस्थिती , उपजीविका भागवणे ही अवघड असताना कुटुंबाला उघड्यावर टाकून समाजासाठी दिवस रात्र झटणारा निस्वार्थी व्यक्तिमत्व .
महाराष्ट्र राज्यातील सत्ताधारी विरोधी नेत्यांना घाम फोडणार व्यक्तिमत्व .
२०२४ सालीच्या लोकसभेच्या ४८ जागांच्या पाच टप्प्यात निवडणुका आणि या निवडणुकांसाठी देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना महाराष्ट्रात २६ सभा घेण्याची वेळ मनोज ( दादा ) जरांगे पाटील यांच्यामुळे आली आहे .
सलग आठ महिने सायंकाळी ४ ची सभा रात्री ४ वाजता सभा आणि दिवसा सभा घेणारा व्यक्ती. दिवस-रात्र २४ तास सभा घेणारा व्यक्ती जगातील पहिले व्यक्तिमत्व .
का त्या व्यक्तीच्या पाठीमागे एवढा महाराष्ट्रातील जनसमुदाय उभा राहिला. यावर पण सरकारने विचार करण्याची गरज होती .
काय आहे असं त्या व्यक्तीमध्ये , महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाज मनोज जरांगे पाटील म्हणतील तो आदेश . मराठा समाजा पाटलांच्या आदेशाची वाट पहात आहे.
सर्वात जास्त उपोषण करणारे पंधरा दिवस, सतरा दिवस १९ दिवस उपोषण करणारे व्यक्तिमत्व .
जालियनवाला लाठी हल्ला तसेच लोकशाही मार्गाने उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा आंदोलका वर गुन्हे दाखल करणे .
सुईनुसार सरकारकडून सत्तेचा गैरवापर करून लोकशाही पद्धतीने करणारे आंदोलन दडपवण्याचा प्रयत्न .
राज्य सरकार चालवणाऱ्या सरकारची महाराष्ट्र राज्यावर हुकूमशाही करून लोकशाही संपुष्टात आणण्याचा प्रयत्न . या गोष्टीमुळे सामान्य लोकांचा लोकशाही वरील विश्वास संपुष्टात आल्याचे चित्र दिसत आहे .
समाजासाठी त्याग
ज्या व्यक्तीने आपल् घरदार उघड्यावर टाकून समाजासाठी दिवस-रात्र काम करत आहे . आठ महिने झाले अजूनही घराचे पायरी न चढलेले व्यक्तिमत्व - मनोज ( दादा ) जरांगे पाटील यांनी. महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाजाला कुणबी मराठा सर्टिफिकेट मिळण्यासाठी जीवाचे रान केले . ७० वर्षांपूर्वीच्या जुन्या नोंदी शोधण्याचं काम मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणातून उपोषण करून नोंदी शोधण्यास भाग पाडण्याचे काम सरकारला केले आहे . आणि आता त्या कुणबी नोंदीच्या आधारे सर्व महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या लोकांना सगे सोयरे कायदा पारित करून त्याची अंमलबजावणी करण्यास भाग पाडण्याचे काम मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे .
मनोज ( दादा ) जरांगे पाटील यांचा जीवन परिचय
Manoj Jarange Patil Marathi News |
ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखले जाणाऱ्या बीड जिल्ह्यामधील शिरूर तालुक्यातील मातोरी या छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या क्रांतीसुर्य मनोज जरांगे पाटील यांनी संघर्ष करून समाजासाठी त्यांच्या हक्काचा लढा उभारला . बीड जिल्ह्यातील दुष्काळी भागातील मातोरी गाव आणि त्यात तिघे भाऊ असल्यामुळे त्यांच्या वडिलांना घरचा उदरनिर्वाह भागवणे सुद्धा अवघड जात होते . घरची हालाखीची परिस्थिती मध्ये घर खर्च भागवण्यासाठी पूर्ण कुटुंब शेतीवर अवलंबून असायचे कोरडवाहू जमीन पावसावर अवलंबून राहावं लागायचं . दोन-तीन वर्षातून एखाद्या वर्षी पाऊस पडायचा आणि परत दोन-तीन वर्ष दुष्काळ असायचा. पाऊस नाही पडल तर पोट भरण्याचे वांदे व्हायचे. शेवटी दुष्काळाच्या अभावामुळे मनोज जरांगे पाटील यांना पंधरा वर्षांपूर्वी आपले मातोरी गाव सोडून जालना जिल्ह्यातील महाकाळा या गावी आपल्या कुटुंबासहित स्थलांतर करावे लागले . लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवंत , चारित्र्यवंत , इतिहासाची , पराक्रमाची , भगवे स्वराज्य , अशा चारित्र्य पूर्ण विचारांकडे मनोज जरांगे पाटील हे आकर्षित झाले. त्यांना एक प्रकारचे शिवरायांचे विचारांचे वेड लागल्यासारखे झाले होते . आपली जशी परिस्थिती तशी इतरत्र सर्वांची पण तीच परिस्थिती असणार हे त्यांनी डोळ्यांनी पाहिले आहे . या परिस्थितीमध्ये आजच्या युगात संघर्षावर मात करणे ही काही सोपी गोष्ट नव्हती .
मनोज जरांगे पाटील यांनी ५० पेक्षा जास्त आमरण उपोषण केली असून ही आमरण उपोषण फक्त जालना जिल्हा पुरतीच माहिती होती . जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथील आमरण उपोषण अगोदर मनोज जरांगे पाटील यांनी साक्षाळ पिंपरी या ठिकाणी सुद्धा अनेक सोळा दिवस ते २० दिवसा पर्यंत आमरण उपोषण केले होते . मनोज ( दादा) जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा समाजाच्या अनेक मागण्यासाठी ऑक्टोबर महिन्यापासून फेब्रुवारी महिन्यापर्यंत सलग चौथ्यांदा पंधरा ते वीस दिवसांचे चार वेळेस आमरण उपोषण केले होते .२०११ सालापासून सुरू झालेल्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यात मनोज जरांगे पाटील यांनी उडी घेतली. पुढे त्यांनी २०१४ साली संभाजीनगरच्या विभागीय आयुक्ताच्या कार्यालय वर काढलेल्या मोर्चाचे नेतृत्व जरांगे पाटलांनी केलं होतं. २०२१ साली मनोज जरांगे पाटील यांनी साष्टळ पिंपळगाव या ठिकाणी तब्बल तीन महिने ठिय्या आंदोलन केले होते . अनेक उपोषण करून मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या आंदोलकांच्या कुटुंबीयांना उपोषण करून मदतही मिळून दिली होती .
मनोज जरांगे पाटील यांनी घरातून बाहेर पडताना त्यांच्या घरच्यांना सांगितले होते कि आरक्षण घेतल्याशिवाय घराची पायरी चढणार नाही . जगलो तर तुमचा नाहीतर समाजाचा मेलो तर समाजासाठी , मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या बायकोला सांगितले आरक्षण घेऊन आलो तर तूझा नाहीतर समाजाचा कुंकू पुसून तयार राहा . अशी जिद्द बाळगून मनोज जरांगे पाटील आपल्या घराबाहेर पडले . तब्बल आठ महिन्यापासून मनोज जरांगे पाटलांचा लढा चालू आहे . अजून त्यांना घराचा रस्ता माहिती नाही .
शिवबा संघटना
मनोज जरांगे पाटील यांनी काही महिने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे महाराष्ट्र राज्याचे काँग्रेसचे प्रमुख नेते होते यांच्या मार्गदर्शनात असलेल्या युवक काँग्रेस चे सदस्य म्हणून मनोज (दादा) जरांगे पाटील यांनी काही महिने काम पाहिले पण त्यामध्ये काही त्यांचे मन रमले नाही . त्यानंतर त्यांनी शिवबा संघटनेची स्थापना करून मराठा समाजासाठी काम करण्यास सुरुवात केली . शिवबा संघटनेमार्फत अन्याय झाला त्या ठिकाणी न्याय देण्याचे काम या शिवबा संघटनेने केलेले आहे.
कोपर्डी हत्याकांड
कोपर्डी प्रकरणातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या केलेल्या प्रकरणातील आरोपींना अहमदनगर येथील न्यायालयात हजर करताना न्यायालयीन परिसरात आरोपीवर जो हल्ला झाला होता याच मनोज जरांगे पाटील यांच्या शिवबा संघटनेने आरोपीवर हल्ला केला होता . या हल्ल्यात त्यांचे साथीदार तिघे जण पोलिसांच्या ताब्यात सापडले होते . त्या तिघांना पाच वर्ष कारावास भोगावा लागला होता . जोपर्यंत त्यांचे साथीदार कारावासात होते तो पर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या घराची पायरी ही चढली नव्हती . यावरून असं म्हणायचं आहे की मनोज जरांगे पाटील यांनी एखादी गोष्ट आपल्या मनावर घेतली कि ती गोष्ट पूर्ण केल्याशिवाय ते राहत नसायचे . आपल्या मित्रासाठी आपल्या समस्त समाजासाठी त्यांनी आपल्या घराकडे ही पाठ फिरवली होती. मनोज ( दादा) जरांगे पाटील हे नाव जालना आणि अंबड या जिल्ह्यापुरतेच मर्यादित होते . मनोज जरांगे पाटील यांनी अनेक उपोषण केली आहेत . जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी स्वतःची जमीन ही विकून टाकली आहे . मनोज जरांगे पाटील यांनी ५० च्यावर आंदोलनही केले आहेत आणि मोर्चेही काढले आहेत .
आमरण उपोषण म्हणजे प्रशासनाच्या विरोधात फक्त पाणी पिऊन मरेपर्यंत उपोषण करणे . आमरण उपोषण म्हणजे बेमुदत उपोषण , त्या उपोषणाला कोणतीही मुदत नसते . जो पर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा यावेळी मुदत उपोषणातून दिला जातो . म्हणूनच या उपोषणाला आमरण उपोषण असे म्हणतात .
Manoj Jarange Patil Marathi News |
जालना वाला लाठी हल्ला
हा देशात जालियनवाला लाठी हल्ला म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध झाला.
२०२३ सालातील मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्ट रोजी आमरण उपोषणास सुरुवात केली होती. हे आंदोलन सुरू झाल्यापासून आंदोलनाची धगही वाढत चाललेली होती. जशी धग वाढत होती तसा समाजही एकवटण्यास सुरुवात झाली होती. हे आंदोलन मागे घेण्यासाठी सरकारने अनेक वेळा विनंती केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आंदोलन करते जरांगे पाटील यांच्याबरोबर फोनवर आंदोलन माघे घेण्या संदर्भात चर्चाही केली होती पण मनोज ( दादा ) जरांगे पाटील हे आंदोलनावर ठाम होते. मनोज जरांगे पाटील हे जालना जिल्ह्यातील अंतरवाली येथे आमरण उपोषण आंदोलनास २९ ऑगस्ट रोजी बसले होते . त्यांच्यासोबत त्यांचे आठ सहकारी ही आमरण उपोषणास बसले होते .यामध्ये मधुकर भिमराव मापारी (वय ५९, वाळकेश्वर ), अर्जुन नामदेव काटकर ( वय ४७ पाथरवाला बु.), महेश मारोती खोजे (वय २३, तिर्थपुरी), गंगुबाई दत्तात्रय तारख (वय ७०, अंतरवाली सराटी), संभाजी पांडुरंग गव्हाणे (वय ३८, वडीकाळ्या), विशाल दत्तात्रय झांजे (वय २८, अंतरवाली सराटी), प्रकाश जगन्नाथ सोळुंके (वय ४४, पाथरवाला बु.) यांचा समावेश होता.
३० ऑगस्ट रोजी आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री कार्यालयाच्या एका प्रतिनिधीने उपोषणस्थळी भेट देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र आम्हाला आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय हवा , अशी भूमिका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा आंदोलनकर्त्यांनी घेतली. आंदोलनकर्त्यांनी आपले उपोषण सुरुच ठेवले. आंदोलन सुरू केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोनकर्ते मनोज जरांगे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क सांधला होता. मात्र , त्यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला होता. पुढे ३१ ऑगस्ट रोजी उपोषणाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी वडीगोद्री गाव बंद ठेवण्यात आले होते. शिवाय शहागड साष्टपिंपळगाव, जाऊन तीर्थपुरी, अंतरवाली सराटी ग्रामस्थांनीही शुक्रवारी गाव बंदची हाक दिली होती. वडीगोद्री ग्रामपंचायतने गुरुवारी ग्रामसभेत ठराव घेतला. तसेच गावात कडकडीत बंद पाळण्यात आला ग्रामस्थांनी रॅली काढून उपोषणस्थळी मराठा आरक्षणासाठी आंदोलकांना पाठींबा दिला. शहागड येथील व्यापारी महासंघानेही या बंदला पाठिंबा दिला. शिवाय बंदची हाक दिली आणि मागण्यांचे निवेदन उपनिरीक्षक गणेश राऊत यांना दिले.
Manoj Jarange Patil Marathi News |
उपोषणामुळे आंदोलकर्त्यांची प्रकृती खालावली पोलिस त्यांना उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी आले. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. राहूल खाडे, उप विभागीय अधिकारी दिपक पाटील यांनी चर्चा केला. मात्र, तोडगा निघाला नाही. पोलिसांचा फौजफाटा वाढल्याने आंदोलन स्थळावरील आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर बाचाबाची चालू असताना पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला त्यानंतर आंदोलकां कडून दगडफेक सुरू झाल्याने पोलिसांनी अश्रुधुराचा मारा करत हजारो आंदोलकांवर लाठीचार्ज केला. शेकडो आंदोलक व नागरिक जखमी झाले. शिवाय अप्पर पोलिस अधीक्षक राहूल खाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे, बीडचे अप्पर पोलिस अधीक्षक यांच्यासह १५ते २० पोलिस अधिकारी, कर्मचारी जखमी झाले. या लाटी हल्ल्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर पडले. सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्याकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली . हा लाठी हल्ला इतका भयंकर होता की पोलिसांकडून या हल्ल्यात छार्याच्या बंदुकीतील गोळ्याचा वापर करण्यात आला यामध्ये अनेक आंदोलक लहान पाच पाच दहा दहा वर्षाचे मुलं जखमी झाले . लहान मुलं महिला वय वृद्ध , वयस्कर, अशा अनेक प्रकारच्या आंदोलन कर्त्यावर गोळ्या झाडण्यात आल्या . अश्रू धुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. या भयंकर लाठी हल्ल्यात आया बहिणीचे लहान मुलांचे डोके फुटले . कोणाचे पाय मोडला . तर लहान मुलाच्या पायात बंदुकीच्या गोळीतील छरे घुसले . या लाठी हल्ल्याची तीव्रता संपूर्ण महाराष्ट्रात पसरली शुक्रवारी रात्रीच कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर आगारातील बसेसचीही तोडफोड करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्यात असलेले महायुतीचे सरकार मध्ये गृह खात्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या आदेशाने हा लाठी हल्ला झाला असे आरोप त्यांच्यावर झाले . या लाठी हल्ल्याची चौकशी व्हावी अशी विरोधी पक्षाकडून मागणी ही झाली .
Manoj Jarange Patil Marathi News |
Manoj Jarange Patil Marathi News |
राज्य सरकारची भूमिका
जालियनवाला लाठी हल्ला झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार , संभाजी राजे भोसले , उदयनराजे भोसले, राज ठाकरे , उद्धव ठाकरे , महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , धनंजय मुंडे , गिरीश महाजन , बच्चू कडू, सह महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळासहित विरोधी पक्षांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली.या लाठी हल्ल्या मागे सरकारचा मुख्य हेतू हे आंदोलन गुंडाळायचे होते. पण हा प्रयत्न सरकारचा पूर्णपणे फसला . हा लाठी हल्ला पूर्णपणे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अंगलट आला . कारण त्यावेळेस तत्कालीन गृह खाते हे त्यांच्याकडे होते .
Manoj Jarange Patil Marathi News |
जालना जिल्ह्यातील सराटी येथे झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला होता . या प्रकरणी दोषींवर कारवाई करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घेण्याची मागणी देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्रही लिहिले होते. पोलिसांनी केलेला लाठी हल्ल्यात घरात घुसू घुसू हजारो आंदोलकावर लाठ्या चालवल्या गेल्या.अंतरवाली सराटी येथील उपोषणाची जागा या ठिकाणी ते मुक्काम करतात . आणि मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रभर दौरे करतात. खिशात एक रुपयाही नसताना समाजासाठी लढायचे कसे हे त्यांच्याकडून शिकावे लागते . आजच्या कलियुगात कोणीही पैसे कमावण्यासाठी बसलेला आहे . राजकारणापासून व्यवसायिकापर्यंत . पण या मनोज जरांगे पाटील यांचे वेगळे विचार आहेत . राज्य सरकारने त्यांच्यावर अनेक कुरघोड्या केल्या . राज्यातील सत्तेतील आणि विरोधातील सर्व नेत्यांनी मिळून मनोज दादा जरांगे पाटलांवर चक्क एसआयटी स्थापन केली . का म्हणे लोकशाही मार्गाने जरांगे पाटलांनी उपोषण केल्यामुळे तसेच त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल करण्यास सुरुवात केली . त्यांचे आंदोलन सुद्धा दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला .
Manoj Jarange Patil Marathi News |
१४ ऑक्टोबर २०२३ मराठ्यांची विराट सभा
१४ ऑक्टोबर रोजी जगातील सर्वात मोठी सभा मनोज दादा जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी या ठिकाणी सभा झाली . या सभेला दीड ते दोन कोटी मराठा समाज उपस्थित होता . या सभेसाठी चारी बाजूने वीस किलोमीटर पर्यंत लोकांची गर्दी होती. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अखंड महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळत होता . आता तरी सरकारला जाग येईल. आपल्या मागण्या मान्य होतील. या आशेने मनोज जरांगे पाटील यांचा लढा पुढे चालूच राहिला . सरकारला काही घाम फुटत नव्हता . आणि मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यावर ठाम राहून एक इंच ही मागे सरकत नव्हते .अंतरवाली सराटी येथील सभा एवढी मोठी होते की एवढ्या दीड ते दोन कोटी समाजाची भव्य सभा पार पडली . राज्य सरकारने या सभेचे लाईव्ह प्रक्षेपण करणे तर बाजूलाच राहिले . पण जालना बीड जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद केली होती . अंतरवाली सराटी अंबड तालुक्यातील अंकुश नगर भागातील या ठिकाणच्या सर्व विद्युत पुरवठा खंडित केला होता . सभेसाठी आलेल्या कोट्यावधी लोकांचे पाण्या वाचून आणि खाण्या वाचून आपार हाल झाले कि लोकांना पिण्यासाठी पाणी सुद्धा त्या भागात शिल्लक राहिले नाही . जनावरांना पिण्यासाठी सुद्धा पाणी शिल्लक राहिले नाही . लोक मिळेल तिथे सांडपाणी वापरायचे पाणी , आंघोळीसाठी दोन्ही भांडी करण्यासाठी साठवलेले पाणी सुद्धा पिऊन आपली तहान भागवत अक्षरश सर्व पाणी संपले . राज्य सरकारने जाणून बुजून वीज पुरवठा खंडित केल्याने लोकांचे हाल झाले . पण मनोज जरांगे पाटील यांच्यावर असलेल्या अफाट प्रेमापोटी एक माणूस ही मनाला नाही की आमचे सभेमध्ये हाल झाले .
Manoj Jarange Patil Marathi News |
मनोज जरांगे पाटील यांनी ही आंदोलनाची धग अशीच पुढे चालू ठेवली. पुढे बीड येथे मराठा समाजाची डिसेंबर महिन्यात निर्णय सभा घेण्यात आली. या सभेला लाखो लोक उपस्थित होते . या सभेमध्ये अंतरवाली सराटी ते मुंबई दोन कोटी लोकांना घेऊन जरांगे पाटील १८ जानेवारी पासून आंदोलन करत जाणार होते . आणि मुंबईमध्ये २६ जानेवारी पासून आझाद मैदान वर आमरण उपोषण करणार होते . त्याप्रमाणे अंतरवाली सराटी मधून जरांगे पाटलांनी मुंबईकडे आंदोलन करत जाण्यास सुरुवात केली. लाखो लोक आंदोलनास सहभागी झाले जसे जसे पुणे जवळ येईल तसे लाखोचे रूपांतर कोट्यावधी लोकांमध्ये झाले . जरांगे पाटील यांची मुक्कामाच्या ठिकाणी छावणीचे स्वरूप यायचे आंदोलनाचे मुक्काम हे शक्यतो डोंगराळ भागात ठरलेले असायचे. कारण एवढा कोट्यावधी समाज कोणत्याही गावात बसणं शक्य नव्हता . मनोज जरांगे पाटील यांचा ताफा एवढा मोठा होता की तीन दिवस पुणे शहर बंद पडले होते . वाशी मध्ये पोहोचलेल्या मनोज जारंगे पाटील यांचा ताफा एवढा मोठा होता की जगातील सर्वात मोठे मार्केट भाजीपाला, अन्नधान्य , फळे हे मार्केट सलग तीन दिवस बंद होते . वाशीचे मार्केट बंद असल्यामुळे संपूर्ण देशात या मार्केटचा परिणाम झाला. भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडले . मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनामुळे सरकार पूर्णपणे हातबल झाले . अखेर शेवटी सरकारला मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलना समोर झुकावे लागले आणि सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी देऊन विशेष अधिवेशन घेऊन सगे सोयरे कायद्याचे कायद्यात रूपांतर करण्याचा शब्द देण्यात आला . हे एक मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाला यश आल्यास जमा झाले होते. पण अधिवेशनात सरकारने सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करु असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या शिष्टमंडळाने दिला होता . पण त्याचे कायद्यात रूपांतर केले नाही . सरकार दिलेल्या शब्दाप्रमाणे वागले नाही . समाजालाही वाटले मुंबईला जाऊन आपला काही फायदा झाला नाही . पण मुंबईला जाऊन सर्वात मोठा हा फायदा झाला कि सगे सोयरे कायद्याचे अंमलबजावणी झाली पण त्याचे कायद्यात रूपांतर होईपर्यंत मीं एक इंच ही मागे सरकणार नाही . असा शब्द म्हणून जरांगे पाटील हे वारंवार देत होते आणि देत राहिले आणि देत आहेत . सलग आठ महिन्यापासून मराठा समाजासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांनी पुरता सरकारला घाम फोडला आहे .
Manoj Jarange Patil Marathi News |
मराठा समाजाच्या मागण्या ? व यश
मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजातील मुलांना शंभर टक्के शिक्षण मोफत व्हावे .
मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत महाराष्ट्र राज्यातील सर्व सरकारी नोकर भरती स्थगित करावी . परंतु सरकारने हे मागण्या मान्य केल्या नाही.
जरांगे पाटील यांनी उपोषणाच्या व आंदोलनाच्या जोरावर ७० वर्षापासून आतापर्यंत अंधारात असलेल्या लाखो कुणबी नोंदी शोधण्यास सरकारला भाग पाडले . हे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे सर्वात मोठे यश होते. याच कुणबी नोंदीच्या आधारे लाखो कुणबी मराठा सर्टिफिकेट मराठा समाजातील मुलांना भेटले आहेत . याच कुणबी मराठा सर्टिफिकेटच्या आधारे नोकरी सुद्धा बऱ्याच जणांना लागल्या आहेत . उर्वरित मराठ्यांना सुद्धा सत्तर वर्षापूर्वी सापडलेल्या कुणबी मराठा नोंदीच्या आधारे सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी . यासाठी म्हणून जरांगे पाटलांचा संघर्ष अजूनही चालूच आहे . मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण इतके झालेत की त्यांचे शरीर त्याना साथ देत नाही . तरीपण जरांगे पाटील यांनी सांगितले आहे की जोपर्यंत माझ्या शरीरात जीव आहे . तो पर्यंत मराठा समाजाला सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी केल्याशिवाय मी मागे हटणार नाही . येणाऱ्या चार जूनला मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले आहे . ४ जून पासून आंतरवली सराटी येथे आमरण उपोषणा सुरुवात करणार आहेत .
मनोज ( दादा ) जरांगे पाटील यांच्या एका आदेशाची वाट संपूर्ण मराठा समाज पाहत आहे . पाटील म्हणतील तोच आमचा निर्णय . पाटील आमच्यासाठी सर्वस्व आहेत . जोपर्यंत मराठा समाजाला सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करून त्याचे कायद्यात रूपांतर होत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहणार आहे .
आपण आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.🙏
0 Comments
ही कोणत्याही प्रकारची गव्हर्नमेंट वेबसाईट नसून ही प्रायव्हेट वेबसाईट आहे . या प्रायव्हेट वेबसाईटवरील माहिती दुसर्या वेबसाईटवर कन्फर्म करू शकता . आमची वेबसाईटवरील माहिती वाचल्याबद्दल धन्यवाद