Loksabha Marathi News
कर्जत मतदारसंघ हा आपला महायुतीचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे इथली तुम्ही काळजी करू नका - अजित दादा पवार
Loksabha Marathi News |
नव्याने आमदार झालेल्यांना आपल्या मतदारसंघात लक्ष घातले पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. ते सोडून रोहित यांनी राज्यभर पदयात्रा सुरू केल्या. त्यांना स्थानिक प्रश्नांची जाण नसतानाही त्याला देशाचा नेता बनण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. विकासाची कोणतेही कामे केली नसून मी जर निधी दिला नसता तर मंदिरात घंटा वाजवत बसला असता.लंके यांना लोकसभेत जाण्याची घाई झाली आहे. आधी त्यांना पत्नीला निवडणुकीत उतरवायचे होते. त्यासाठी ते माझ्याकडे येत होते. पुढे त्यांना स्वत:च उतरण्याची इच्छा झाली.जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांच्या निधीसाठी खा.डॉ.सुजय विखे पाटील यांना विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. आहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी कर्जतमध्ये सभा झाली. त्यासभेत पवार बोलत होते. अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आमदार प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत, बाजार तळ येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार,आमदार प्रा. राम शिंदे, उमेश पाटील, बाळासाहेब नाहटा, प्रविण घुले, माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर,अंबादास पिसाळ, प्रा. सचिन गायवळ, भाजपा तालुका अध्यक्ष अजय काशिद, मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टाफरे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष महेश निमोणकर, राजेंद्र नागवडे, बापुसाहेब नेटके, अशोक खेडकर, बाजार समितीचे सभापती पै.शरद कार्ले, नगरसेवक अमित चिंतामणी, बिभीषण धनवडे, मोहन गडदे, बाजीराव गोपाळघरे, सचिन पोटरे, शहराध्यक्ष पवन राळेभात, मंगलदास बांदल, राजेंद्र गुंड, बाळासाहेब शिंदे, काकासाहेब तापकीर, नानासाहेब निकत, पानसरे, संतोष धुमाळ, सुरज रसाळ, अल्लाउद्दीन काझी, शहाजीराजे भोसले, शांतीलाल कोपनर, अक्षय शिंदे यांच्या सह महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, केंद्रातून जास्तीत जास्त निधी आणून राज्याचा विकास करण्याचा निर्धार आम्ही केला आहे. त्यासाठी महायुतीचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचे आहेत. यामुळे आपण जिल्ह्याच्या विकासासाठी महायुतीच्या उमेदवाराला मतदान करा असे आवाहन करताना नगर माझे आजोळ असून येथील शेतकऱ्यांच्या विकासासाठी मी प्रयत्न केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र यांच्यासोबत चांगले सुर जुळले असून सध्याचे महायुती सरकार हे गोरगरिबांचे सरकार असून सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. देशात पंतप्रप्रधान मोदींनी मागील १० वर्षात केलेल्या कामाच्या जोरावर देशात पुन्हा एनडीए आणि राज्यात महायुती सरकार येणार आहे. यामुळे इतरांनी कितीही प्रतत्न केले तरी त्यांना यश मिळणार नाही असे त्यांनी सांगितले. महायुती सरकार आणि जलसंपदा विभागाच्या मार्फत नगर जिल्ह्या दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगत त्यांनी शरद पवारांवर नाव न घेता निशाणा साधला. ते म्हणाले ८० वर्षाच्या पुढे इतरांना संधी दिली पाहिजे, पण आमचे जेष्ठ रिटायर होतच नाही. यामुळे आम्ही काय करायचे असे सांगत आपली खंत व्यक्त केली. त्यावेळी त्यांनी विरोधी उमेदवार यांना धारेवर धरले, आधी बायकोसाठी उमेदवारी मागण्यासाठी आला नंतर लोकांनी हवा दिली आणि स्वतः खासदारकीच्या मैदानात आला अशा शब्दात त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा समाचार घेतला. या वेळी उमेदवार डॉ. विखे म्हणाले, ज्या लोकांना वाटते पारनेरमध्ये विकास कामे झाली, त्यांनी पारनेरच्या लोकांना फोन करून गेल्या पावणे पाच वर्षांत काय कामे झाली, याची चौकशी करा. अजित पवार यांनी लंके यांना मोठा निधी दिला. गेल्या ४५ दिवसांपासून लोकसभेचा प्रचार सुरू आहे. विरोधी उमेदवाराने आपल्या आमदारकीच्या काळात पारनेर तालुक्यात काय काम केले हे सांगण्याचे धाडस का केले नाही . आता सगळीकडे महायुतीचे सरकार आहे आणि वारे पण आपलेच आहे .
0 Comments
ही कोणत्याही प्रकारची गव्हर्नमेंट वेबसाईट नसून ही प्रायव्हेट वेबसाईट आहे . या प्रायव्हेट वेबसाईटवरील माहिती दुसर्या वेबसाईटवर कन्फर्म करू शकता . आमची वेबसाईटवरील माहिती वाचल्याबद्दल धन्यवाद