लोकसभेत पाठवण्याची जबाबदारी मतदारांची पाटोदा तालुक्यातील अंमळनेर , पिंपळवंडी , उंडेवाडी , साबळेवाडी, पांढरवाडी , गांधणवाडी, कोतन , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे बालेकिल्ले - संतोष आप्पा पोकळे .
Loksabha Marathi News |
बीड प्रतिनिधी . राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार गटाचे बीड लोकसभेचे अधिकृत उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी पाटोदा तालुक्यातील मतदार सरसावले आहेत. तसेच पाटोदा तालुक्यातील अंमळनेर मध्ये राम कृष्ण हरी वाजवा तुतारी चा जय घोष घुमत आहे . संतोष आप्पा पोकळे यांनी पुढे बोलताना सांगितले की बीड जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्द्यावर लोकसभेमध्ये आवाज उठवणार आहे .हा आवाज मतदारांन च्या विचारांचा आवाज लोकसभेत राहील . यासाठी बजरंग बप्पा सोनवणे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून मतदार देणार आहे . सध्याच्या परिस्थितीत बीड जिल्हा हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा असून या जिल्ह्यात बेरोजगार तरुणांची जास्त संख्या आहे. बीड जिल्ह्यातील तरुणांची बेरोजगारी कायमस्वरूपी संपवायचे असेल आणि ऊसतोड मजुरांचा जिल्हा हा सर्वात मोठा कलंक बीड जिल्ह्याला पुसायचा असेल तर ते फक्त बजरंग बप्पा सोनवणे हेच करू शकतात . बीड जिल्ह्यात औद्योगिक विकास करण्यासाठी बीड जिल्ह्यात उद्योगधंदे वाढवणे गरजेचे आहे . उद्योगधंदे वाढले तर बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल . |
बजरंग बप्पा सोनवणे यांनी क्रांतीसुर्य मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आठ महिन्यापासून सुरु असलेल्या मराठा आरक्षणाचा लढा अजून चालू आहे . या लढा यशस्वी करण्यासाठी लोकसभेत ताकतीने आवाज उठवणार आहे. असे अर्जुन आबा पवार यांनी सांगितले आहे . तसेच मराठा आरक्षण बरोबर , मुस्लिम बांधव , धनगर बांधवाच्या आरक्षणाचा आवाज लोकसभेत उठवणार आहेत . त्यामुळे लोकसभेत बीड जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्द्यावर आवाज उठवण्यासाठी बजरंग बप्पा सोनवणे यांना पाटोदा तालुक्या मधील मतदार तुतारी फुंकणाऱ्या माणसाला लीड देणार . असे संतोष आप्पा पोकळे यांनी सांगितले .
राजकारणा अगोदर समाजाला प्राधान्य महत्त्वाचे - मच्छिंद्र पोकळे टेलर .
राजकारण करणाऱ्यांनी अगोदर समाजाच्या प्रश्नाला महत्त्व देणे गरजेचे आहे . समाजाचे प्रश्न डोळ्यासमोर ठेवून नंतर राजकारण करावे . सामाजिक बांधिलकी झोपासावी. मच्छिंद्र पोकळे टेलर यांनी पुढे बोलताना सांगितले की राजकारणामुळे तरुण पिढीचे भवितव्य बरबाद होत आहे त्यामुळे तरुण पिढीने अगोदर वैयक्तिक जीवनात लक्ष देणे गरजेचे आहे . सामान्य माणसाचा राजकारण हा धंदा नाही कोणी आपल्याला तेल मीठही देत नाही . त्यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासून राजकारण करावे असे आवाहन मच्छिंद्र पोकळे टेलर यांनी केले आहे .
मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा लोकसभेत उठवण्यासाठी बजरंग बप्पा सोनवणे यांचा शब्द - माजी सरपंच अर्जुन आबा पवार.
जो आमच्यासाठी आम्ही त्याच्यासाठी - ज्येष्ठ नेते रमेश भाऊ पोकळे .
बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मतदारांमध्ये कधीच दुरावा येऊ देणार नाही . असा शब्द बजरंग बप्पा सोनवणे यांनी मतदारांना दिलेला आहे . आणि शपथ ही घेतलेली आहे त्यामुळे आता राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गटाचे लोकसभेचे अधिकृत उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांना मतदारांनी प्रचंड बहुमूल्य मतदान रुपी आशीर्वाद देऊन राम कृष्ण हरी देवाचे नाव घेऊन तुतारी वाजवावी असे रमेश भाऊ पोकळे यांनी पाटोदा तालुक्यातील मतदारांना आवाहन केले आहे . दहा वर्षात भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यापासून लोकशाहीचे रूपांतर हुकूमशाहीत झालेले आहे . ही हुकुमशाही ही लोकशाही घातक ठरते हुकूमशाहीचा नायनाट करण्यासाठी आणि राजकीय अस्थिरता संपवायची असेल तर मतदार राजांनी विचार करण्याची गरज आहे .
0 Comments
ही कोणत्याही प्रकारची गव्हर्नमेंट वेबसाईट नसून ही प्रायव्हेट वेबसाईट आहे . या प्रायव्हेट वेबसाईटवरील माहिती दुसर्या वेबसाईटवर कन्फर्म करू शकता . आमची वेबसाईटवरील माहिती वाचल्याबद्दल धन्यवाद