सण उत्सव शांततेत पार पाडा - जिल्हाधिकारी | Beed Marathi News

Beed Marathi News 

नागरिकांनी सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन शांतता बैठक मधून करण्यात आले .


Beed Marathi News

Beed Marathi News




बीड प्रतिनिधी. आज पासून महाराष्ट्रातील वेगवेगळे सण उत्सवास सुरुवात होत आहे . या सण उत्सवाच्या काळातच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये.  म्हणून शांतता समितीची बैठक घेण्यात आली . या बैठकीच्या माध्यमातून लोकसभेच्या निवडणुका व याच काळात येणारे सण उत्सव आणि लोकसभेच्या निवडणुकीमुळे राज्यात लागलेली आचारसंहिता या सर्वांचा विचार करता कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी. पोलीस प्रशासनाने  यासाठी सतर्क रहावे .  आज पासून सुरू झालेल्या महत्त्वाच्या सणासुदीच्या काळात गुढीपाडवा, रमजान ईद, रामनवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती, महात्मा ज्योतिबा फुले जयंती, भारतरत्न  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असे अनेक हिंदू मुसलमानांचे सण  तसेच थोर संत, विचारवंत, व महापुरुषांच्या जयंती च्या सोबत आचारसंहिता चालू आहे. या काळात  नागरिकांना ध्वनी प्रदूषण  तसेच वेगवेगळे कार्यक्रम घेणारे  आयोजक यांच्यामार्फत  कसलाही त्रास होऊ नये .

                    आयोजकांनी  ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण राखावे  . तसेच नागरिकांनी  सर्वधर्मीय शांतता बाळगावी . या काळात आचारसंहिता लागली असल्यामुळे एखाद्या व्यक्तीकडून चुकीचे कृत्य घडून आल्यास त्या व्यक्तीस आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कारवाई होऊ शकते. बीड जिल्ह्यात लोकसभेच्या 13मे ला निवडणूक होणार आहेत. या सर्व  विषयांच्या पार्श्वभूमीवर  जिल्हा अधिकारी दीपा मुधोळ  यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन सभागृह शांतता बैठक पार पडली .  या बैठकीस पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडेकर, केज चे  उपविभागीय पोलीस अधिकारी  कमलेश मीना, डॉक्टर धीरज कुमार, अनिल चोरमुले, नीरज कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्यासह विविध विभागातील पोलीस निरीक्षक तसेच कर्मचारी व शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.

                        ९ तारखेपासून सण उत्सवांची सुरुवात होत आहे . ११ तारखेला रमजान ईद त्यानंतर लगेच १४ तारखेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती  असे एकापाठोपाठ एक  चार-पाच चार-पाच दिवसाच्या  अंतरावर उत्सव येत आहेत. १७ तारखेला श्री राम नवमी संपूर्ण देशात साजरा केला जाणारा हा मोठा सण या दिवशी श्रीरामांचा जन्म झाला . त्यानंतर भगवान महावीर जयंती २१ तारीख  आणि २३ तारखेला हनुमान जन्मोत्सव अशी एप्रिल एकूण महिन्यात सात ते आठ  उत्सव येतात. त्यामुळे उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियोजन करण्यात आले.



Post a Comment

0 Comments